Breaking News

भाजप हे शक्तीचे दुसरे रूप

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन

माथेरानमधील सामाजिक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाचे सक्षम नेतृत्व आणि पक्षाच्या माध्यमातून होत असलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन माथेरानमधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 4) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पनवेल येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशर्त्यांचे शाल देऊन स्वागत केले. भाजप हे शक्तीचे दुसरे रूप हे देशात बनले आहे, असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले. या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, माथेरान शहर उपाध्यक्ष किरण चौधरी, सरचिटणीस राजेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव, राकेश चौधरी, प्रदीप घावरे, आदिवासी मोर्चा तालुका अध्यक्ष संदीप कदम, उद्योजक दीपक शहा, ज्येष्ठ नेते अरविंद शेलार, चंद्रकांत जाधव, दीपक शहा, अरविंद शेलार, संदीप कदम, राकेश चौधरी, संतोष शेलार यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी योगेश मधुकर जमदाडे, प्रतीक मनोज कासूरडे, ओमकार कृष्णा रांजाणे, किरण नारायण चौधरी, शैलेश मधुकर जमदाडे, मकरंद मनोहर रांजाणे, राहुल रमेश चौधरी, मयूर रमेश चौधरी, कुंदन मंगेश परदेशी, सौरभ प्रदीप घावरे  यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे उपस्थित मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले. भाजप असाध्य ते साध्य करण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. त्यामुळे भाजपची शाल अंगावर टाकली गेल्याचा तुम्हाला अभिमान वाटेल. पक्षाची ताकद तुमच्या पाठीशी सदैव राहील, असे सांगून सेवा पंधरवड्यानिमित्त पक्षाच्या वतीने राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. आपल्याला सर्व नागरिकांपर्यंत भाजपने केलेल्या विकासकामांची माहिती पोहचवून त्यांना आणखी काय पाहिजे याची माहिती घ्यायला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply