तळोजामध्ये इमारतीच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त
दसर्याच्या शुभ मुहूर्तावर नव नवीन उद्योग, व्यवसाय तसेच शुभ कार्य सुरु करण्याची परंपरा आहे. त्याअंतर्गत तळोजा फेज 2 येथील सेक्टर 24 प्लॉट नंबर 12 येथे मिनाक्षी इंटरप्रायझेेसचे रितेश केणीच्या माध्यमातून मिनाक्षी हाईट्स ही इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या कामाचे भुमीपूजन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 5) झाले.
भूमिपुत्रांनी आपली जमीन बांधकाम व्यवसायिकाला फिफ्टी फिफ्टी तत्वावर न देता आपणच स्वतः विकासक होऊन प्रोजेक्ट उभारण्याची संकल्पना घेऊन पेठाली येथील केणी परिवाराने आपल्या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. दसर्याच्या मुहूर्तावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मिनाक्षी हाईट्स हा प्रकल्प सुरू करून या क्षेत्रात उतरल्याबद्दल रितेश केणी यांचे अभिनंदन केले. दरम्यान, माजी नगरसेवक हरेश् केणी यांच्या प्रेरणेनेच आपण हा सुरू केल्याची भावना रितेश केणी यांनी व्यक्त केली. या भुमीपूजनावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी, अमर पाटील, पापा पटेल, माजी पंचायत सदस्य नामदेव केणी, राम पाटील, विशाल खानावकर, रवी म्हात्रे, दिलीप पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
कामोठ्यात क्लिनीकचे उद्घाटन
कामोठे : रामप्रहर वृत्त
दसर्याच्या शुभ मुहूर्तावर डॉ. पंकज डेरे यांनी कामोठे येथे इंपीरीयल असव्हान्स होमीओपॅथी क्लिनीक सुरू केले आहे. गेल्या 19 वर्षांपासून पंकज डेरे हे या क्षेत्रात आपले योदान देत आहेत. त्यांच्या क्लिनीकचे भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशअंत ठाकूर यांच्याहस्ते बुधवारी (दि. 5) उद्घाटन झाले.
कामोठे सेक्टर 35 येेथील सत्यकेतू कॉम्प्लेक्स मध्ये हे क्लिनीक सुरु झाले आहे. याच्या उद्घानावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवि जोशी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, युवामोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, किशोर गोवारी, महेंद्र गोवारी, रमेश तुपे, सचीन भगत आदी उपस्थित होते.
पनवेल : सहारा कला, क्रिडा व सांस्कृतिक विकास मंडळ तुरमाळे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. या वेली सांगुर्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्तात्रेय हातमोडे, सदस्य शरद वांगिलकर, भाजप शक्ती केंद्र प्रमुख अॅड. निलेश हातमोडे, तुरमाळे बुथ अध्यक्ष विशाल गायकर, अनंत वाजेकर, सतीश हातमोडे, अजित म्हात्रे, अमित वाजेकर, शैलेश शितकंदे, प्रशांत हातमोडे आदी उपस्थित होते.