खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मेडिकवर हॉस्पिटल खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी (दि. 18) या शिबिराची सांगता करण्यात आली. या शिबिरामध्ये मेडिकवर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या आठ चाचण्या घेतल्या. त्यामध्ये ब्लड प्रेशर, रँडम ब्लड शुगर, बॉडी कॉम्पोझिशन एनालिसिस, बॉडी मास इंडेक्स, बोन डेन्सिटी, ईसीजी, इ एन टी, ओरल स्क्रीनिंग व आय चेक अप इत्यादी. या मेघा हेल्थ चेकअप कॅम्पमध्ये विविध शाखेतील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांच्या सुमारे 600 विद्यार्थ्यांनी 50 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी केले आणि विद्यार्थ्यानी यशस्वीरित्या या सर्व आठ चाचण्या यशस्वीरित्या करून घेतल्या. या सर्व चाचण्यांचा फायदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांना झाला आहे. प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना व शिक्षकेतर कर्मचार्यांना तसेच सर्व विद्यार्थ्यांना या सर्व आठ चाचण्या करण्यासाठी प्रोत्साहन दिले व आजच्या धावपळीच्या जीवनातील आरोग्याचे व वैद्यकीय तपासणी चे महत्व पटवून दिले. या आरोग्य शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग प्रमुख प्रा. प्रथमेश ठाकूर यांनी आयोजन केले व प्रा. डॉ. महादेव चव्हाण, प्रा. भाग्यश्री शुक्ला, प्रा. राजश्री म्हात्रे प्रा. प्रतीक्षा पाटील, प्रा. कावेरी घोगरे व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे या सर्वांनी आयोजकांचे कौतुक केले.