पनवेल ः रामप्रहर वृत्त
शहरी भागाबरोबरच पनवेल महापालिका क्षेत्रात असलेल्या ग्रामीण भागातील विकासाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत महापालिकेमार्फत खिडूकपाडा येथे विकासकामांचे भूमिपूजन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 3) झाले. त्या वेळी ते बोलत होते. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका चंद्रकाला शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 9मधील खिडूकपाडा गावात गटारे बनविणे व स्मशानभूमीमध्ये सुधारणा करणे ही कामे 75 लाख रुपयांचा निधी वापरून करण्यात येणार आहेत. महापालिकेमार्फत करण्यात येणार्या या कामांचा शुभारंभ गुरुवारी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमास स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, माजी सरपंच शशिकांत शेळके, आशिष कडू, शंकुनाथ भोईर, निलेश भोईर, प्रभाकर उलवेकर, राहुल उलवेकर, अमर उलवेकर, संजय उलवेकर, पुंडलिक उलवेकर, कमलाकर भोईर, कमलाकर धर्मा भोईर, सखाराम कमलाकर, विष्णू भोईर, विष्णू उलवेकर, वासुदेव उलवेकर, लक्ष्मण ठाकूर, विनोद पाटील, शरद उलवेकर, मिन्नाथ भोईर, उमेश भोईर, कुणाल भोईर, सुरज गोंधळी, चंद्रकांत उलवेकर, रवी उलवेकर, संयोग उलवेकर, मयूर उलवेकर, बाबू उलवेकर, धनाजी उलवेकर, हरिश्चंद्र उलवेकर, सोमनाथ उलवेकर, नवनाथ उलवेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.