Breaking News

पोलीस भरतीतील वयोमर्यादेत वाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई ः प्रतिनिधी

शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील तरुणांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पोलीस भरतीतीच्या कमाल वयोमर्यादेत वाढ केली आहे. यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छूक असलेल्या तरुण-तरुणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत ज्या उमेदवारांची वयाची कमाल मर्यादा पूर्ण झालीय अशा सर्व प्रवर्गातील उमेदवारांना या निर्णयामुळे एक संधी मिळणार आहे. 2021 आणि 21 या वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी एकवेळची उपाययोजना म्हणून हे उमेदवार पात्र असतील. पोलीस भरतीसाठी राज्य सरकार प्रवर्गानुसार कमाल वयाची अट ठरवते. वयाची अट पूर्ण झाल्यानंतर इच्छूक उमेदवार भरतीच्या स्पर्धेतून आपोआप बाहेर होतो. कोरोनामध्ये दोन वर्ष सर्वकाही बंद होते. त्यामुळे शासकीय नोकरभरती आणि पोलीस भरतीही होऊ शकली नाही तसेच राज्य लोकसेवा आयोगाने याआधीच वयोमर्यादेत वाढ केली होती. त्यामुळे पोलीस शिपाई भरतीसाठीही वयाच्या मर्यादेत वाढ करावी, अशी तरुणांची मागणी होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली. त्यामुळे निवडक तरुणांना पोलीस होण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply