Breaking News

आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईकर चमकले

नवी मुंबई : बातमीदार
दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या दुसर्‍या ओपन इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईच्या दोन खेळाडूंनी प्रत्येकी एक रौप्य आणि कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत 900पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते .
नवी मुंबईतील सुरज पुजारीने रौप्यपदक आणि परेझ नादार यांनी कांस्यपदक पटकावित नवी मुंबईचे नाव गाजवले. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल खेडमधील विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत करीत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. खेळाडूंना प्रमुख शिक्षक म्हणून नवी मुंबई किकबॉक्सिंगचे अध्यक्ष आशिष राणे, शीतल राणे व महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष निलेश शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply