माथेरान : रामप्रहर वृत्त
कर्जत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत गौळवाडी येथे आयोजित धावण्याच्या स्पर्धेत माथेरानमधील प्राचार्य गव्हाणकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी धावण्याच्या शर्यतीत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
17 वर्षाखालील गटात हर्षाली संतोष ढेबे पहिली, तर 14 वर्षाखालील गटात प्राजक्ता प्रशांत कदम दुसरी आली. दोघीही अलिबाग येथे होणार्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाल्या आहेत. केंद्रप्रमुख नारायण सोनवणे यांनी दोघींना रोख पारितोषिक देऊन गौरविले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, शिक्षक संघपाल वाठोरे, धनगर समाज अध्यक्ष दीपेश ढेबे, संघपाल वाठोरे, वर्षा शिंदे यांनी अभिनंदन केले. या वेळी धनगर समाज माजी अध्यक्ष राकेश कोकळे, शैलेश ढेबे, करण जानकर आदी उपस्थित होते.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper