Breaking News

कर्जत तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन

कर्जत : प्रतिनिधी

तालुक्यातील रस्त्यांचे तसेच नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. ही विकासकामे तीन कोटी 82 लाख रुपयांची आहेत. आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून  एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून चिंचवली-एकसळ आणि सुमारे एक कोटी वीस लाख रुपये खर्च करून एकसळ-भानसोली हे रस्ते तयार करण्यात येत आहेत. तसेच जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुमारे 62 लाख रुपये खर्च करून एकसळ गावासाठीची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते या तिन्ही विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. एकसळ गावात झालेल्या या भूमिपूजन सोहळ्याला माजी सरपंच संतोष भोईर यांच्यासह शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

भारतमाता चित्रपटगृहाशी माझं नातं अगदी वेगळं…

भारतमाता चित्रपटगृहाने छान कात टाकली. ते आजचं झाले.बदल हा होतच असतो, तो व्हायलाही हवा. काही …

Leave a Reply