Breaking News

बाळासाहेबांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच

पनवेल : वार्ताहर

पनवेल महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये हजारो महिलांनी रामदास शेवाळे पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या नेतृत्वामध्ये पक्ष प्रवेश केला. नवीन सुधागड विद्या संकुल कळंबोली येथे आशाताई विचारे (बाळासाहेबांची शिवसेना उपनेत्या), विजय नाहटा (बाळासाहेबांची शिवसेना उपनेता), संजय मोरे (सचिव बाळासाहेबांची शिवसेना) आदींच्या प्रमुख उपस्थतीत भव्य महिला मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा झाला. या वेळी मोठ्या संख्येने महिलांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला. या वेळी कळंबोली सरस्वती महिला संस्थेच्या कुंदाताई गोळे,  पनवेल महानगर महिलाप्रमुख सुलक्षणा जगदाळे, पनवेल उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply