पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना पार्श्वभूमीवर माजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरिबांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.
यामध्ये गव्हाण येथील शिवाजीनगर येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोरगरीबांना अन्नधान्याच्या पॅकेट्सचे वाटप केले. या पॅकेट्समध्ये मैदा, रवा, डाळडा, साखर, गुळ, चणा डाळ असे आहे. या वेळी गावच्या पंच कमिटीने सोशन डिस्टन्सिंगचे पालन करीत सर्वांना अन्नधान्याचे वाटप केले. या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.