Breaking News

तुपगावच्या कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय संकटात

मोहोपाडा ः प्रतिनिधी

खालापूर तालुक्यात परंपरागत मडकी घडविण्याचा व्यवसाय तुपगाव, चौक, चिंचवली आदी कुंभारवाडयात चालत होता. या कुंभारवाड्यांमध्ये 30पेक्षा जास्त कुटूंब आज वास्तव्यास आहेत. सध्या ही मातीची मडकी व विविध प्रकारच्या भांड्यांना मागणी कमी झाल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे कुंभार समाजबांधवांना इतर व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. पूर्वीच्या काळी गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच घरांमध्ये मातीच्या भांड्यांचा वापर केला जात असे. दूध मडक्यात गरम केले जात असे, तसेच दही मडक्यात लावले जात असे. त्यामुळे या दुधाला व दह्याला वेगळी चव येत होती. त्यामुळे ते आवडीने खाल्ले जात असे. आता मात्र या मातीच्या भांड्यांची जागा धातूच्या भांड्यांनी घेतली आहे. त्यामुळे मातीच्या भाड्यांची मागणी कमी झाली आहे. म्हणून कुंभारसमाज नोकरी, गवंडीकाम, वेल्डींग, मजूरी अशी कामे करुन आपली उपजिविका भागवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तुपगाव येथील दत्ता कुंभार यांनी आपला व्यवसाय सुरू ठेवला असून लग्नाचे कडे, मातीची चूल व इतर कार्याला लागणार्‍या मातीच्या वस्तू निर्मितीचा व्यवसाय करीत आहेत, परंतु सध्याच्या स्टेनलीस स्टील, अल्युमिनियम, प्लास्टिकच्या भांड्यांच्या काळात मातीच्या भांड्यांना मागणी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply