Breaking News

अलिबागची वाहतूक सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित

अलिबाग ः प्रतिनिधी

अलिबाग शहरातील महावीर चौक येथील बंद असलेली वाहतुक सिग्नल यंत्रणा दोन वर्षांनी गुरुवारी (दि. 29) पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे. शहरातील वाढणारी वाहनांची संख्या आणि बेशिस्त वाहनचालक यांना लक्षात घेऊन महावीर चौक आणि अशोका सेंटर परिसरात सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली. नगरपालिकेने जवळपास 20 लाख रुपयांचा निधी यासाठी खर्च केला. तांत्रिक तपासणीनंतर या दोन्ही सिग्नल यंत्रणात वाहतूक पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आल्या. यानंतर वाहतुकीचे नियमन योग्य प्रकारे होईल आणि बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लागेल, अशी अपेक्षा होती. महावीर चौकातील काही महिने वापरल्यानंतर जवळपास दोन वर्ष बंद होती. गुरुवारी सकाळी ही सिग्नल यंत्रणा पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली. या सिग्नल व्यवस्थेमुळे शहरातील वाहतुकीचे नियमन होण्यास मदत होईल आणि बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लागण्यास मदत होईल.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply