Breaking News

नेरे ग्रामपंचायतीच्या सदस्य कल्पना वाघे भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये नेरे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना अशोक वाघे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांनी आपल्या समर्थकांसह शनिवारी (दि. 31) भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले.
या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, माजी सदस्य गोटीराम पाटील, निलेश पाटील, गोपीनाथ पाटील, गोपाळ रोडपालकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, मिलिंद पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्या कल्पना वाघे यांच्यासह सुरेश वाघे, दशरथ वाघे, बाळू वाघे, गोपाळ वाघे, संतोष वाघे, पोशा वाघे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply