Breaking News

नववर्षानिमित्त रविवारी रामबागमध्ये लाईव्ह म्युझिकल इव्हेंट

पनवेल : रामप्रहर वृत्त
दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथे उभारण्यात आलेल्या माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब उद्यान अर्थात रामबागमध्ये नवीन वर्षनिमित्त लाईव्ह म्युझिकल इव्हेंट या सुरेल गाण्यांची मैफिल असलेल्या संगीतमय कार्यक्रमाचे रविवारी (दि. 1 जानेवारी 2023) रोजी सायंकाळी 6.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी स्वर्गसुख आनंद देणारी रामबाग साकारली आहे. 14 एकर जागेतील या रामबाग उद्यानात भव्य आणि सुरेख प्रवेशद्वार, निसर्गरम्य हिरवळीसह विविध प्रकारच्या फुलझाडांच्या विविध रचना, तलाव, विद्युत रोषणाई, पदपथ, चिरेबंदी बांधकाम, आसन व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे, डबल हर्ट आणि स्टोन सेल्फी पॉईंट, मचवा, पाण्याचे कारंजे अशा सर्व बाबी आकर्षक व मनमोहक पद्धतीने आहेत. सायंकाळी या उद्यानाचे रूप बदलते. त्या वेळी तेथील विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारी असते आणि हा संगीतमय कार्यक्रम सायंकाळी असल्याने त्याचा रसिकांना मनमुराद आनंद घेता येणार आहे. कार्यक्रम निशुल्क असून अधिक माहितीसाठी अभिषेक पटवर्धन (9029580343) किंवा गणेश जगताप (9870116964) यांच्याशी संपर्क साधावा.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply