Breaking News

उरणमधील वृद्धेचा खुनी गजाआड

उरण ः वार्ताहर
तालुक्यातील बोकडविरा गावातील वृद्ध महिला ललिता ठाकूर यांचा खून करुन फरार झालेला आरोपी अमोल
सर्जेराव शेलार याला अहमदनगर येथून अटक करण्यात उरण पोलिसांना यश आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या 24 तासांच्या आत तपास करून खुन्याला बेड्या ठोकल्या.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोकडविरा गावातील ललिता ठाकूर या महिलेने उदरनिर्वाहासाठी शेजारचीच खोली अमोल सर्जेराव शेलार याला भाड्याने दिली होती. त्याच खोलीला बाहेरून कुलूप लावलेल्या अवस्थेत मंगळवारी (दि. 3) ललिताबाईंचा मृतदेह आढळून आला होता. अमोल शेलार हा भाडोत्री इसम घटनेपासून फरार झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. ललिताबाई यांच्याशी भाडोत्र्याचे भांडण झाले होते. या वादातूनच खून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. दरम्यान, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब, फिंगरप्रिंट, श्वान पथक दाखल करुन खुन्याचा शोध सुरू केला तसेच संशयित फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना केली होती. ललिताबाई ठाकूर यांच्या खूनप्रकरणी अमोल शेलार यास पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने नगर येथून अवघ्या 24 तासांच्या आत ताब्यात घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply