Breaking News

शेकाप, राष्ट्रवादीवर आ. महेंद्र दळवींची सडकून टीका

निगडे सरपंच कल्पना म्हात्रे यांचा जंगी सत्कार ; गावातून काढली वाजत-गाजत मिवणूक
पाली : प्रतिनिधी
शेकापच्या बालेकिल्यात आमदार होऊन शेकापचे घरच उध्वस्त केलेय अशी टीका आमदार महेंद्र दळवी यांनी केली. रायगड जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी मला फसवलं पण जनतेने आमदारपदी बसवलं असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्ष रायगड़ जिल्हा प्रमुख आ.महेंद्र दळवी यांनी केले. निगडे ग्रामपंचायतीत विजयाची हॅट्रीक मारणार्‍या नवनिर्वाचित सरपंच कल्पना म्हात्रे व विजयी उमेदवारांचा आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते जंगी सत्कार करण्यात आला. गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आ. दळवी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने मुसंडी घेत अनेक ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता काबीज केली आहे. राजकीय व सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण व प्रतिष्ठेची मानल्या जाणार्‍या निगडे ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेने विजयाचा झेंडा दिमाखात रोवला आहे. कल्पना संजय म्हात्रे या तिसर्‍यांदा सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. निगडे ग्रामपंचायतीत शिवसेनेची तिसर्‍यांदा विजयाची हॅट्रिक असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सत्कार समारंभात यावेळी महेंद्र दळवी यांनी शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. शेकाप राष्ट्रवादीची ताकत संपुष्टात आली असून रायगडात शिंदे गट व भाजपाचे वर्चस्व सिद्ध झालेय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिंदे सेना व भाजपा एकत्र निवडणुका लढविणार आहेत. रायगड जिल्ह्यात रोजगाराची संधी निर्माण व्हाव्यात यासाठी नव्याने येणार्‍या प्रत्येक उद्योगाचे आम्ही स्वागत करतोय. विकासासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आ. दळवी यांनी दिली. उपजिल्हाप्रमुख संजय म्हात्रे म्हणाले, आ. दळवी यांनी निगडे ग्रामपंचायत हद्दीत विकासकामासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून देऊन अभूतपूर्व विकासकामे केल्याने जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिले व पुन्हा सत्तेत संधी दिली. महेंद्र दळवी हे देव माणूस असल्याचे उद्गार संजय म्हात्रे यांनी काढले. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते तथा युवा सेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निगडे ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यात आली. या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार कल्पना संजय म्हात्रे यांनी विजयाची हैट्रिक मारली. आ.महेंद्र दळवी यांच्या हस्ते सरपंच कल्पना संजय म्हात्रे उपसरपंच पांडुरंग पोशा म्हात्रे, बबन म्हात्रे, अविनाश पांडुरंग म्हात्रे, चंद्रकांत रामदास मोकल, शोभा धनाजी भोईर, प्रतिक्षा दीपक म्हात्रे, अंजली सुभाष नाईक, रवीना यशवंत नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातून वाजत गाजत रॅली काढण्यात आली. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी, युवासेना रायगड जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे , माजी जि. प. सभापती संजय जांभळे, माजी जि. प सदस्य, सुधागड तालुकाप्रमुख रवींद्र देशमुख, अ‍ॅड. मनोज शिंदे, सामाजिक कार्यकर्ते उद्धव कुथे, उपजिल्हाप्रमुख अनुपम कुलकर्णी, नगरसेवक विनायक जाधव, संदीप दबके, विजय म्हात्रे – सामाजिक कार्यकर्ते, राजेंद्र म्हात्रे, एच. ए. म्हात्रे, प्रभाकर म्हात्रे, विनायक म्हात्रे, भास्कर म्हात्रे, पांडुरंग म्हात्रे, पी. ए. म्हात्रे, माजी सरपंच प्रीती कुथे , सरिता पाटील, तुकाराम म्हात्रे, जगदीश म्हात्रे, संतोष म्हात्रे, जे. एन. म्हात्रे, काशिनाथ धर्मा म्हात्रे, किरण म्होत्र, लक्ष्मण नाईक, नवनीत म्हात्रे, निलेश म्हात्रे, वासुदेव म्हात्रे, डॉन नाईक, दिपक म्हात्रे, सुहास म्हात्रे, सुभाष नाईक, गणेश म्हात्रे, केशव म्हात्रे, नरेंद्र भोईर, भास्कर भोईर, सुनंदा म्हात्रे, मनिषा मोकल, सुरेश म्हात्रे, विशाल म्हात्रे, गजानन भोईर, विजय भोईर, धनाजी भोईर, वसंत म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, सुरेश भोईर, योगेश म्हात्रे, विकी म्हात्रे, प्रितम म्हात्रे, रघुनाथ म्हात्रे, नितीन म्हात्रे, रमेश म्हात्रे, संदेश म्हात्रे, निखिल म्हात्रे, जयराम म्हात्रे, नंदकुमार म्हात्रे, नितेश तांबोळी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply