नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि. 10) कोकण भवन येथे निवडणूक अधिकारी व उपायुक्त मनोज रानडे यांच्याकडे सादर केला.
या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार किसन कथोरे, आमदार महेश बालदी, आमदार भरत गोगावले, आमदार निरंजन डावखरे, आमदार बालाजी किणीकर, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन आदी उपस्थित होते. या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होणार असून 2 फेबु्रवारीला मतमोजणी होणार आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …