पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील शिरढोण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक रविवारी (दि. 2) झाली. यात भारतीय जनता पक्षाच्या मोनाली रोशन घरत यांची बिनविरोध निवड झाली. याबद्दल केळवणे विभागीय जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच मोनाली घरत यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील यांच्या निरीक्षणाखाली निवडणूक प्रक्रिया झाली. या वेळी शिरढोण ग्रामपंचायतीच्या सरपंच साधना कातकरी, अनंत वाकडीकर, कोअर कमिटी अध्यक्ष प्रितेश मुकादम, माजी सरपंच नारायण चौधरी, माजी सदस्य पांडुरंग चौधरी, राम वाजेकर, रामदास पवार, रोशन घरत, सुधीर माळी, दीपक ठोकळ, पवन मुकादम, डायमंड मित्र मंडळ अध्यक्ष महेश माळी, महेश मुकादम, गुरू माळी, प्रदीप मुकादम, महादेव घरत, रूपेश घरत, अनंत पवार, अनंता भोपी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.