Breaking News

कालवली येथील पाणीसमस्या मार्गी

आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेचे भूमिपूजन

पोलादपूर ः प्रतिनिधी

तालुक्यातील कालवली येथे जलजीवन मिशन पाणी योजनेचे भूमिपूजन शनिवारी (दि. 14) आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते झाले. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची कालवली येथील पाणीसमस्या दूर होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. या वेळी राजिप माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शौकत तारलेकर, माजी सभापती रवींद्र फुलसुंदर, विभागप्रमुख सयाजी मांढरे, वासुदेव पवार, सिद्धार्थ सकपाळ, उमेश कालेकर, मुराद भेलेकर, सागर शेलार, नवनिर्वाचित सरपंच किरण पवार, उपसरपंच सविता सयाजी भोसले, सदस्य महामूद तिवडेकर यांच्यासह सवाद धारवली विभागातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गेली अनेक वर्षे कालवली गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती, मात्र आता कालवली ग्रामस्थांचा पाणी प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply