Breaking News

आदिवासी शेतकर्‍यांचा वहिवाटीचा रस्ता अडवला

गोदरेज कंपनीविरोधात शेतकरी करणार आंदोलन

खालापूर : प्रतिनिधी

खालापूरातील तांबाटी येथे असलेल्या गोदरेज कंपनीच्या आवारात शेतकरी अडीच एकर शेती असून शेतीमध्ये जाण्यासाठी गोदरेजचे व्यवस्थापन रस्ता देत नसल्याचा आरोप शेतकर्‍याने केला आहे. या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी शेतकर्‍याने केली असून गोदरेज कंपनी व्यवस्थापनाच्या आडमुठ्या आणि दडपशाही विरोधात स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कंपनी व्यवस्थापनाने 8 दिवसांत तोडगा काढण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने शेतकरी कुटुंबाने खालापूर तहसीलदारांना निवेदन देत आम्हाला शेतीमध्ये जाण्याचा रस्ता द्या अन्यथा संपूर्ण कुटुंबासह उपोषण करणार असा इशारा दिला आहे.  गोदरेज कंपनीच्या आवारात संतोष हिरामण मंगाळ आणि अन्य शेतकर्‍यांची शेती आहे. गोदरेजने कंपाऊंड केल्याने शेतकर्‍यांचा वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे. शेतात जाण्यासाठी कोणताही अन्य रस्ता नसल्याने वहिवाटीचा रस्ता मोकळा करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. मात्र गोदरेज व्यवस्थापन आडमुठी भूमिका घेत दडपशाही करत असल्याने  संतापाचे वातावरण आहे.  कंपनीच्या आवारात आमची जमीन आहे. आम्ही वहिवाटीचा रस्ता देण्याची मागणी गोदरेज कंपनीच्या व्यवस्थापनाकडे केल्यानंतर इतके वर्षे तुम्ही कुठे होता असा प्रश्न करण्यात आला. आमची शेती असताना आम्ही लोकांच्या शेतीत भाजीपाला पिकवून आमचा उदरनिर्वाह करतो. आता आम्हाला आमची शेती लावायची आहे. त्यामुळे आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी करीत कंपनीने 5 कुटुंबातील 3 जणांना कामावर घेण्याचे आश्वासन न पाळता शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा फायदा घेत दिलेली रक्कम बँकेतून परस्पर काढून घेतली असल्याचा आरोप यमुना वाघमारे यांनी केली आहे. दरम्यान 7 दिवसांपूर्वी कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याने खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांची भेट घेऊन आम्हाला शेतीवर जाण्यासाठी व नांगर बैलगाडी व नांगरणी करण्यासाठी बैल जोडी घेऊन जाता येईल असा मार्ग  उपलब्ध करून देण्याचे निवेदन दिले आहे. तहसीलदार आयुब तांबोळी यांनी माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गोदरेज सारख्या नामांकित कंपनीकडून शेतकर्‍यांची अडवणूक होत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार

आदिवासी शेतकर्‍यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रारही केली होती. दरम्यान स्नेहल गायकवाड, सारिका लाड, अनिता चव्हाण, सरिता मेंगाळ, यांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर जाऊन या कंपनीच्या आवारात असणार्‍या शेतकर्‍यांच्या जमिनी खालापूर तहसील कार्यालयाचे कर्मचारी मंडळ अधिकारी कामत यांच्यासह प्रवेश केला. आम्हाला आमच्या उपजीविकेचे साधन असणारी शेती करण्यासाठी बैल जोडी व अवजारे घेऊन जाण्याची विनंती केली. कंपनी व्यवस्थापनाने या शेतकर्‍यांना 4 किमी वळसा घालून वडवळ गावावरून जाण्यासाठी दिलेला प्रस्ताव आदीवासी शेतकर्‍यांनी फेटाळून लावला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply