खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात दि. 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या दरम्यान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने वेगवेगळे दिवस साजरे करण्यात आले तसेच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
यामध्ये रांगोळी स्पर्धा, नेल आर्ट, मेहंदी, टी-शर्ट पेंटिंग तसेच हॅलोवेन या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. राहुल कांबळे यांनी केले तसेच प्रा. मीनल मांडवे, प्रा. दीपिका हसीजा, प्रा. तनुजा सुमन, प्रा. डॉ. महादेव चव्हाण, प्रा राजश्री म्हात्रे, प्रा. प्रतीक्षा पाटील यांनी सहकार्य केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले व या वेगवेगळ्या दिवसांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले व पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper