कर्जत तालुका बुथ सक्षमीकरण बैठकीत विविध विषयांवर चर्चा
कर्जत ः रामप्रहर वृत्त
डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक घटनांचे व स्थळांचे भान ठेवून तेथे सरकारी उपक्रम व योजना राबविल्या. माता रमाबाईंनाही न विसरता त्यांच्याही जीवनकार्याचा मान-सन्मान ठेवून त्यांच्या नावेही कांही विधाययक व लोकोपयोगी उपक्रम व योजना प्रामाणिकपणे राबविल्या. हे सर्व आपण जनतेला सांगितले पाहिजे. यासाठी आपले सामाजिक माध्यम सतर्क असले पाहिजे. आपला लोकसंपर्क दांडगा ठेवलाच पाहिजे. मी स्वतः अनुसूचित जातीमधील बौध्द समाजाचा आहे. त्यामुळे मी हे निक्षून सांगत आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही समाजाची कामे आत्मियतेने आणि यशस्वीपणे करीत आहोत. याचा आम्हाला अभिमान आहे.’ असे प्रतिपादन कर्जत तालुका संपर्क प्रमुख, अनुसूचित जाती मोर्चा, रायगड जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक अॅड. प्रकाश बिनेदार यांनी प्रतिपादन केले. ते भारतीय जनता पक्ष, कर्जत तालुका यांच्यावतीने बुधवारी कै. बापुराव धारप सभागृह, नेरळ येथे आयोजित केलेल्या बुथ सक्षमीकरण बैठकीत मार्गदर्शक म्हणून बोलत होते. बैठकीत त्यांनी आयोजकांचे शिस्तबध्दता व विषयांचे क्रमवार सादरीकरण करीत उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल शाबासकी देवून कौतुक केले. या बैठकीत भारतीय जनता पक्ष राबवित असलेले उपक्रम सरल अॅप, फ्रेंड्स ऑफ मोदी, नव मतदार नोंदणी, 8 मार्च जागतिक महिला दिन, धन्यवाद मोदीजी, सोशल मिडिया जागृती, समर्पण सप्ताह (मायक्रो डोनेशन), शक्ती केंद्र विस्तारक योजना, आगामी निवडणूक कार्यक्रम, 6 एप्रिल भाजप स्थापना दिन, युवा वॉरीयर आणि 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या विषयीचे प्रमुख अनुक्रमे राजेश भगत, नितीन कांदळगांवकर, रमेश कदम, स्नेहा गोगटे, प्रमोद पाटील, प्रध्नेश खेडकर, नम्रता कांदळगांवकर, संजय कराळे, रमेश मुंठे, मंगेश म्हसकर आणि जयदास जाधव यांनी सविस्तरपणे माहिती दिली. या बैठकीचे अध्यक्ष भाजप कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर होते. यावेळी कर्जत तालुका सरचिटणीस दिपक बेहरे यांनीही मार्गदर्शन केले. तसेच पक्ष पदाधिकारी संदिप म्हसकर, नरेश मसणे, प्रविण सकपाळ, बळवंत धुमरे, सरस्वती चौधरी, अभिजित पटेल, संदिप पालांडे, सचिन म्हसकर, दशरथ पोसाटे, अर्जुन फोपे, निलेश पिंपरकर, रविद्र म्हात्रे, अंकुश मुने, गुरुनाथ सोनावळे, मंगेश फुलावरे, केशव तरे, किरणशेठ ठाकरे, प्रमोद पाटील किरण घाग, नविन देशमुख, योगेश घारे, राजेश भगत, नगरसेविका प्रियंका कदम, नगरसेविका प्रतिभा धावरे, रमेश कदम, श्रध्दा कराळे, परशुराम म्हात्रे, संतोष शिंगाडे, अरुण नायक, रमेश कदम, अनुसुचित जाती मोर्चा, रायगड सरचिटणीस प्रभाकर पवार, अनुसुचित जाती मोर्चा, पनवेल शहराध्यक्ष श्याम साळवी, उपाध्यक्ष संदेश जाधव, चिटणीस अमोल जाधव तसेच बुथ अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख, नगरसेवक, पक्षपदाधिकारी, पक्षकार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.