Breaking News

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांसाठी विशेष परवानगी द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिवेशनात मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने राज्यात 14 ते 16 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत शासनाने विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा मांडताना म्हटले की, येत्या 14 एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती आहे. शिंदे-फडणवीस सरकार या राज्यामध्ये आले, तेव्हापासून अनेक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत. 14 एप्रिल रोजी आंबेडकरी अनुयायी सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व पद्धतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. यंदा 14 एप्रिलला शुक्रवार, तर 15 एप्रिल शनिवार आणि 16 तारखेला रविवार आहे. जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. त्यामुळे सर्व अनुयायांची या तीनही दिवस कार्यक्रमांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगीची मागणी आहे. त्या अनुषंगाने 14 ते 16 एप्रिलपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत राज्यात शासनाने विशेष परवानगी द्यावी आणि त्या संदर्भात घोषणा करावी, असेही या औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply