पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुक्यातील शिवकर येथे एका अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने एका अल्पवयीन तरुणाची कुर्हाडीने हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ घडली आहे.
विनय विनोद पाटील असे या अल्पवयीन तरुणाचे नाव असून त्याची मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने कुर्हाडीच्या सहाय्याने हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक घटनास्थळी रवाना झाले होते. हत्या कोणी व कोणत्या उद्देशाने केली असावी याचा शोध घेण्याचे आवाहन पनवेल शहर पोलिसांसमोर आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …