Breaking News

सरस्वती तंत्रनिकेतनमध्ये योग वासंतिक शिबिर

खारघर : रामप्रहर वृत्त  : येथील सरस्वती तंत्रनिकेतन महाविद्यालयात एक महिन्याचे योग वासंतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सुरोशे सर यांनी केले. शिबिराला मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सुरोशे सरांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाचे काय महत्त्व आहे हे सांगितले.

‘सुखी जीवनाचा सुखी मंत्र’ म्हणून योग कसा महत्त्वाचा आहे. हे विविध उदाहरणाच्या माध्यमातून पटवून दिले. या योग शिबिराचे आयोजक ‘इन्स्टिट्युट ऑफ योगा आणि रिसर्च फाऊंडेशन’ हे होते. या योग शिबिराचे आयोजन डॉ. स्मितांजली भिसे यांनी केले. डॉ. स्मितांजली यांनी विविध प्रकारच्या प्रात्यक्षिकाद्वारे योगाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व समन्वयक समाधान लांडगे व अनिता धामी यांनी परिश्रम घेतले.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply