Breaking News

कर्जतमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 51 विकासकामांचे भूमिपूजन

एकाच दिवसाचा तालुक्यातील विक्रम

कर्जत :प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील नेरळ, शेलू, उमरोली, किरवली, हलिवली ग्रामपंचायत हद्दीत 51 विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (दि. 29) करण्यात आले. एकाच दिवशी 51 विकासकामांचे भूमिपूजन हा तालुक्यातील विक्रमच म्हणावा लागेल. भाजप युवा नेते किरण ठाकरे यांच्या प्रयत्नातून या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी विकासकामांच्या नामफलकांचे अनावरण करण्यात आले.
20 वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांनी कर्जत-खालापूर तालुक्यात एकूण 101 विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन केले होते. त्यापैकी 49 सोहळे कर्जत तालुक्यात, तर 52 विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन खालापूर तालुक्यात केले होते. त्यांचा विक्रम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोडला आहे.
या कार्यक्रमांना आमदार महेंद्र थोरवे, भाजप तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, माजी पंचायत समिती सदस्य नरेश मसणे, माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, प्रदीप घावरे, प्रवीण सपकाळ, नगरसेवक बळवंत घुमरे, अंकुश दाभणे, किसन शिंदे,  गजानन भोईर, राजेश भोईर, तानाजी भोईर, संजय कराळे, प्रकाश पालकर, किशोर ठाकरे, सुबोध ठाकूर, मिनेश मसणे, प्रमोद पाटील, राजेश ठाणगे, अभिजित तिवारी आदी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply