आकुर्ली येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त

साप्ताहिक स्टार पनवेलच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायत आकुर्ली व साप्ताहिक स्टार पनवेलच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व रक्तगट, शुगर तपासणी, तसेच सर्वोपचार शिबिराचे आयोजन आकुर्ली येथील राजीप शाळा येथे करण्यात आले होते. या शिबिरात कळंबोली येथील एमजीएम हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.

या वेळी त्वचारोग, हृदयरोग, नाक, कान, घसा, डोळे, ईसीजी, तसेच सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान सदोष आढळलेल्या रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत कोणताही मोबदला न घेता मोफत उपचार करण्याची तरतूद स्टार पनवेलचे संपादक अनिल राय यांनी केली होती. सकाळी 9.30 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पनवेल परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून आपली आरोग्यविषयक तपासणी करून घेतली.

 सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनसेवेचा वसा व सामाजिक दृष्टिकोन नजरेसमोर ठेऊन हे आरोग्य शिबिर आयोजित केल्याचे प्रतिपादन या वेळी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील यांनी केले. गावातील व पनवेल परिसरातील गोरगरीब नागरिकांना मोफत आरोग्यविषयक तपासणी करता यावी व त्यावर मोफत उपचार व्हावेत हा उदात्त हेतू समोर ठेऊन अशा प्रकारचे सर्वोपचार तपासणी शिबिर नेहमीच आयोजित केले जाईल, अशी ग्वाही देखील भूपेंद्र पाटील यांनी दिली.

या वेळी आकुर्ली गावचे सरपंच सचिन पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ज्येष्ठ पत्रकार पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक विजय कडू, साप्ताहिक कोकण संध्याचे संपादक केवल महाडिक, कोकण डायरीचे संपादक तथा पनवेल प्रेस क्लब अध्यक्ष सय्यद अकबर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

आरोग्य तपासणी शिबिरादरम्यान पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, तसेच अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पत्रकार विकास पाटील, पत्रकार साहिल रेळेकर, पत्रकार आनंद पवार, ग्रामसेवक म्हात्रे, आशीष राय, समाजसेवक ब्रिजमोहन रेखी, ओमकार राय, सतीश पाटील व आकुर्ली गावातील सर्व सहकारी व गावकरी उपस्थित होते.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply