Breaking News

खोपोलीत कडकडीत बंद

जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

खोपोली ः प्रतिनिधी

खोपोलीत पुकारलेल्या तीन दिवसीय जनता कर्फ्यूला शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांनी शनिवारी (दि.  17) पहिल्याच दिवशी आपले व्यवहार बंद ठेवून शंभर टक्के प्रतिसाद दिला. त्यामुळे कोरोनाची वेगाने वाढणारी साखळी तुटण्यास मदत होणार आहे.

मागील आठवड्यात खोपोलीत कोरोनाबाधितांची संख्या दररोज सरासरी 25 ते 30 अशी होती. त्यातच बाधितांना बेड मिळेल याची खात्री नव्हती. अनेक बाधितांना अगदी अलगीकरण करण्यात आले, पण त्यांच्या घरातील मंडळींचा सर्वत्र वावर दिसून आल्याचा अनेकांनी बैठकीत आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नगर परिषद, सामाजिक संस्था आणि सर्वपक्षीय नेतेमंडळी यांनी एक तातडीची बैठक आयोजित करीत जनता कर्फ्यू लावण्याबाबत एकमुखी निर्णय घेतला, मात्र सायंकाळी याचा सोशल मीडियावर तीव्र विरोध झाला, पण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर सर्वांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच नागरिकांना याबाबत आवाहन करण्यात आले.

राजकीय मंडळी, विविध क्षेत्रांतील मान्यवर व पत्रकारांनी शनिवारी सकाळी शहराच्या विविध भागात फिरून जनता कर्फ्यूमध्ये नियमांचे पालन करा, कामाशिवाय बाहेर पडू नका, मास्क वापरा, सतत हात धुवा या व इतर अनेक उपयुक्त सूचना देत स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन केले.

खोपोली शहरात एसटी स व ट्रेन वगळता रहदारीची सर्व वाहने बंद होती, पण प्रवासीच नसल्याने बस स्टॅण्ड,  रेल्वेस्थानकावर शुकशुकाट पहावयास मिळाला. बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे पहिल्या दिवशी जनता कर्फ्यू यशस्वी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, शहर परिसरात पोलिसांनी चोख बंदोस्त ठेवला होता.

कर्जतमध्ये शुकशुकाट

कर्जत : प्रतिनिधी

वीकेण्ड लॉकडाऊन पूर्वी कर्जतमध्ये नेहमी सारखीच गर्दी होती. मात्र पोलिसांनी नाकाबंदी सुरू केल्यानंतर कर्जतच्या बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ कमी झाली. वीकेण्ड लॉकडाऊनमुळे कर्जत बाजारपेठेत शुकशुकाट होता. रविवारी सुद्धा असेच वातावरण असणार आहे.

ब्रेक द चैनसाठी केवळ जीवनावश्यक सेवा सुरू होत्या, मात्र काय बंद, काय सुरू या संभ्रमामुळे व विकेंड लॉकडाऊन होणार असल्याने नागरिकांची मोठी गर्दी कर्जत बाजारपेठेत होती. सारे काही आलबेल असल्यासारखे होते. साखरपुडे, विवाह सोहळे अगदी बिनधास्तपणे सुरू होते. परिणामी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमालीची वाढली. गेल्या आठ दिवसांत तब्बल 509 इतकी होती. असे असले तरी नागरिक घाबरत नव्हते. खरेदीसाठी बिनधास्त पणे शहरात येत होते. त्यांना आवर घालण्यासाठी अखेर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आणि बाजारपेठेत येणार्‍यांची संख्या रोडावली. परिणामी वीकेण्डच्या लॉकडाऊनला कर्जत बाजारपेठे बरोबरच तालुक्यातील अन्य मुख्य बाजारपेठांमध्येही शुकशुकाट होता.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply