पनवेल : रामप्रहर वृत्त
जागतिक योग दिनानिमित्त 21 जून रोजी सकाळी 6 वाजता भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत माची प्रबळगड येथे योगासने करण्याची संधी मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. त्या अनुषंगाने माची प्रबळगड येथे योग दिन साजरा केला जाणार आहे. यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत युवा व ज्येष्ठ योगासने करणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे (9773947777) किंवा शहराध्यक्ष रोहित जगताप (8691930709) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Check Also
नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिटला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट व शुभेच्छा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्तनवीन मुंबईतील यू बिझनेस मीटच्या वतीने नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट …
RamPrahar – The Panvel Daily Paper