Breaking News

सागरा प्राण तळमळला नाटकाला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हर घर सावरकर संकल्पने अंतर्गत पालकमंत्री तथा उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य उदय सामंत  यांच्या पुढाकाराने व आदेशाने पनवेल शहरातील आद्यकांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ’सागरा प्राण तळमळला’ या नाटकाचा विनामूल्य प्रयोग पनवेलकर रसिकांसाठी आयोजित करण्यात आला.  शिवसेना-भाजपाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन यशस्वी करण्यात आलेम प्रचंड संख्येने हा प्रयोग हाऊसफुल्ल झाला. प्रयोगादरम्यान नाट्यरसिकांचा व सावरकर प्रेमींचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता. सावरकरांचे विचार घरोघरी पोहोचवणे या प्रामाणिक जाणिवेतून ही मोहीम सुरू आहे. सावरकर आणि हिंदुत्व फक्त एखाद्या प्रसंगापुरते-राजकारणासाठी वापर न करता एखादे व्रत घेतल्याप्रमाणे सावरकरांच्या विचारांचा जागर हा कायम सुरूच आहे. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक अ‍ॅड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण, शिवसेना शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, शहरसंघटक अभिजित साखरे, उपशहरप्रमुख अर्जुन परदेशी, विभाग प्रमुख आशिष पनवेलकर, तोफिक बागवान, साहिल भुस्कुटे तथा शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी शिवसैनिक व बीजेपी सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन व संपूर्ण टीमचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply