पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि. 15) सकाळी 10.30 वाजता पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने ध्वजारोहण व वंदन समारंभ तसेच युवा मोर्चाच्या वतीने तिरंगा बाईक रॅली होणार आहे.
शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार असून त्यानंतर युवा मोर्चातर्फे शहरात तिरंगा बाईक रॅली होईल. ही रॅली तेथूनच सुरू होणार असून पंचरत्न हॉटेल चौक, शनी मंदिर, वावेश्वर हॉटेल, कापड बाजार, जय भारत नाका, विरूपाक्ष मंदिर, आदर्श कॉर्नर अशी फिरून समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. या समारंभास पदाधिकारी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी केले आहे.
Check Also
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!
मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper