आमदार प्रशांत ठाकूर यांनी मानले आभार
पनवेल ः रामप्रहर वृत्त
राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे आणि त्यांच्या भावनांचा विचार करणारे सरकार असून आई एकविरा मातेच्या मंदिरासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आगरी कोळ्यांसह महाराष्ट्राची आराध्य दैवद, भक्तांच्या हाकेला धावणारी आई एकविरा मातेच्या मंदिरासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 40 कोटींचा निधी मंजूर केला आहे. मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आगरी कोळी भाविकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
मावळ तालुक्यातील कार्ले येथे वसलेले आई एकविरा मातेचे मंदिर हे राज्यातील आगरी, कोळी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. येथे दररोज हजारोंच्या संख्येने भाविक भेट देतात. त्यांच्या सोयीसाठी व मंदिराचे पावित्र्य कायम राहण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 40 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे आभार मानले.