Breaking News

विद्युतदाहिनी बसविण्यासंदर्भात मनपाकडून कळंबोलीतील शानभूमीची पाहणी

नगरसेविका चारुशीला घरत यांची आयुक्तांकडे मागणी

पनवेल ः प्रतिनिधी

भाजप भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी नुकतेच पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना कळंबोली येथे विद्युतदाहिनी बसविण्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने त्यांनी दखल घेत लगेचच आरोग्य निरीक्षक जितेंद्र मडवी, अभियंता चिन्मय सापणे व पर्यवेक्षक हरीश कांबळे यांना कळंबोली येथील स्मशानभूमीची पाहणी करण्याकरिता पाठविले.

या वेळी भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, कळंबोली मंडल अध्यक्ष रवीनाथ पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कमल कोठारी, शरद वाडीकर आदी उपस्थित होते. जागेची पाहणी करून लवकरात लवकर विद्युतदाहिनीचे टेंडर काढून ती कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी जितेंद्र मडवी यांनी दिले. बबन बारगजे यांचे कळंबोलीतील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply