पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यशैलीवर आकर्षित होऊन भिंगारवाडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.9) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार, योजना, उपक्रम गावोगावी, घरोघरी पोहचत आहेत. त्यांचा विकासाचा अजेंडा सर्वांना पसंत पडला असून पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासाची गंगा अवतरली आहे. त्यामुळे विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपमध्ये दाखल होत आहेत. अशाच प्रकारे तालुक्यातील भिंगारवाडी येथील शेकापचे मेघराज अनंत गायकर आणि योगेश वसंत राणे यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले.
पनवेल येथील भाजपच्या तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळस्पे जि.प. विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, भूपेंद्र पाटील, योगेश लहाने आदी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व इतरांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper