Breaking News

नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीलाच मतदान करा -खासदार श्रीरंग बारणे

आपटा सरपंच, सदस्यांसह शेकाप, ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

रसायनी : रामप्रहर वृत्त
गरीब, कष्टकरी, आदिवासी लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीलाच मतदान करा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. ते जाहीर सभा आणि पक्षप्रवेश सोहळ्यात बोलत होते.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप आणि मित्रपक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरण विधानसभा मतदारसंघाची जाहीर सभा आणि आपटा ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा पक्षप्रवेश सोहळा बुधवारी (दि.24) आपटा येथील पाटील मैदानावर आयोजित करण्यात आला होता. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी आपटा गावातील पंचायत समितीच्या माजी सदस्य तनुजा टेंबे, अ‍ॅड. संजय टेंबे, आपटा ग्रामपंचायतीचे सरपंच मयूर शेलार, सदस्य गीता देशमुख, पांडुरंग लेंडे, दामू मांडे, किर्ती कदम, निकीता भोईर, मारुती चव्हाण, संगीता बावदणे, वंदना वाघे, माजी सदस्य प्रभाकर शेलार, किशोर तुरे, अ‍ॅड. करण शेलार, गणेश भोईर, केशव शेलार, योगेश सावंत, योगेश शेलार, जयंता शेलार, रवींद्र शेलार, किरण भोईर, रजनीकांत भोईर, संदीप भोईर, कृष्णा तुरे, प्रकाश शेलार, प्रमोद सावंत, लक्ष्मण भोपी, राज भोईर, रोशन शेलार, काशिनाथ भोईर, भालचंद्र तुरे, चेतन पाटील, विनायक पाटील, रोशन शेलार, सौरभ भोईर, हार्दिक शेलार, गजानन सावंत, नरेश पाटील, कैलास पाटील, देवेंद्र तुरे, सौरभ भोईर, नरेश शेलार, परशुराम सावंत, बंटी शिर्के, अक्षय शिर्के, विलास चिले, सुजाता चिले, देवेश चिले, श्रीकांत कदम, गंगाराम कदम, मेघन टेंबे, अनघ टेंबे, वरद टेंबे, महेश पाटील, किरण मेहेतर, सुशील मेहेतर, गोपाळ किंळजे, महेंद्र टेंबे, परशुराम कदम, शुभांगी कदम, दीपक काकडे, धनश्री काकडे, अमित रापटे, स्नेहल रापटे, विलास शिर्के, वैशाली शिर्के, सुहास कदम, कैलास कदम, दीपक कदम नम्रता कदम, दीव्या कदम, रवींद्र टेंबे, संतोष टेंबे, स्वाती टेंबे, दिघाटीचे अर्जुन ठाकूर व रजनी ठाकूर, शिरढोणचे हिराजी वाजेकर, अक्षय पवार, कल्हे येथील रोहन कदम, साईचे संतोष मोकल, रोशनी मोकल तसेच समीर नाईक यांच्यासह शेकाप व उद्धव ठाकरे गटाच्या अनेकांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले.
या सभेला भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत, जीवन गावंड, केळवणे जि.प. विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, वासांबे विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल, तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, प्रवीण खंडागळे, चावणे विभागीय अध्यक्ष किरण माळी, केळवणे विभागीय अध्यक्ष हिरामण ठाकूर, दिघाटीच्या सरपंच रजनी ठाकूर, सावळे सरपंच सुनील माळी, जांभिवलीच्या सरपंच रिया कोंडीलकर, आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, सदस्य असद पिट्टू, कराडे खुर्द माजी सरपंच विजय मुरकुटे, भय्याशेठ बडे, सुशिल ठाकूर, अतुल भगत,
तालुकाप्रमुख बाळाराम नाईक, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख मेघा दमडे, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे पुढे म्हणाले की, गोरगरिबांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवण्याचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते. आदिवासी पाड्यांमध्ये रस्ते, वीज पोहचवण्याचे काम आपण केले. केंद्रातील आणि राज्यातील महायुती सरकार अत्यंत संवेदनशील आहे. हे लोकाभिमुख सरकार पुन्हा सत्तेत यावे यासाठी महायुतीला मतदान करून पाठबळ देण्याची गरज आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष व्यावसायिक पद्धतीने काम करीत असून बोलण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नसल्याने केवळ विरोधासाठी विरोध करीत आहेत.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी, देशाचे कर्मयोगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सशक्त भारताच्या निर्माणासाठी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
आमदार महेश बालदी यांनी म्हटले की, मावळ लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय. आपल्या देशाला समृद्ध, संपन्न आणि वैभवशाली बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींशिवाय पर्याय नाही. त्याकरिता महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांना बहुमताने खासदार म्हणून विजयी करा.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply