पेण : प्रतिनिधी
रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा शुक्रवारी (दि.26) दुपारी 12.30 वाजता पेण नगरपालिकेच्या मैदानावर होणार आहे.
या सभेला महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, माजी मंत्री व पेणचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, दापोलीचे आमदार योगेश कदम, महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, उरणचे आमदार महेश बालदी, विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महायुतीचे समन्वयक तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांनी दिली.
Check Also
खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ’नॅक’ची ए श्रेणी प्राप्त
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर …