Breaking News

पद्मशाली समाजाचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना कामोठे येथील पद्मशाली समाजाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेल विधानसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार मारण्यासाठी मतदार बंधू, भगिनींच्या आशिर्वादाने सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने पद्मशाली समाज कामोठे यांनी त्यांना आपला जाहीर पाठिंबा दिला.
या पाठिंबापत्रात पनवेल विधानसभा महायुतीचे लोकप्रिय, अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना आम्ही पद्मशाली समाज जाहीर पाठिंबा देत असून आमचा संपूर्ण समाज विरोधकांच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही, असे नमूद करून समाज 100 टक्के आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे असल्याची ग्वाही देण्यात आली आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply