शिवसेना उबाठा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
अलिबाग : प्रतिनिधी
सध्या भाजपचे सदस्य नोंदणी महाअभियान सुरू आहे. या अभियानात सदस्य नोंदणीचा वेग वाढवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करा, असे निर्देश पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
अलिबागजवळील कुरूळ येथील क्षात्रैक्य समाज सभागृहात गुरुवारी (दि. 6) भाजप सदस्य नोंदणी महाअभियान अंतर्गत दक्षिण रायगड जिल्हा संघटन पर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अलिबाग, श्रीवर्धन व महाड विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष आमदार चव्हाण यांनी सदस्य नोंदणी उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हा संघटक सतीश धारप, सहकार आघाडीचे कोकण विभाग सहसंयोजक गिरीश तुळपुळे, भाजप जिल्हा सरचिटणीस अॅड. महेश मोहिते, बिपीन म्हामुणकर, प्रशांत शिंदे, गीता पालरेचा, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, डॉ. मंजूषा कुद्रमोती, सतीश लेले, उदय काठे आदी उपस्थित होते. ज्यांनी एक हजारपेक्षा जास्त सदस्य नोंदणी केली आहे अशांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
या वेळी शिवसेना उबाठाचे माणगाव उपतालुकाप्रमुख सुधीर म्हामुणकर, साई पंचायत समिती गण प्रमुख संतोष कळंबे यांच्या समवेत पेण तर्फे तळे ग्रामपंचायतीच्या सरपंच रसिका राजेंद्र कळंबे, उपसरपंच नामदेव ताम्हणकर, माजी उपसरपंच विजय पेणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते नयन पोटले, पेण गाव माजी अध्यक्ष दत्ताराम वडेकर, गणेश वडेकर, अनिल लाड, दत्ताराम सुतार, नारायण मांगले, सुरेश मांगले, लक्ष्मण दिवेकर, दिनेश वडेकर, सुनील भोसले, सुभाष काळप, रमेश जाधव, सचिन जाधव, मंगेश वडेकर, महादेव बंगाल, किशोर पोटले, केशव मोंडे, सचिन लाड, मधुकर म्हामुणकर, शैलेश म्हामुणकार, महादेव पेडणेकर, बापू पेडणेकर, राजेंद्र सकपाळ, भोलानाथ खिडबिडे, हेमंत ईप्ते, सचिन काशीम, मधुकर वडेकर, रामचंद्र पेणकर, अनिल वाघरे, प्रकाश मोहे, संतोष काळप, अनिल पारधी, रवींद्र भावे यांनीदेखील भाजपत प्रवेश केला. युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी या पक्षप्रवेशासाठी विशेष प्रयत्न केले.