पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा-2मध्ये राज्यात 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र, तर 10 लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता वितरण करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी (दि. 22) झाला. दरम्यान, पनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे बालेवाडीत प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना मंजुरीपत्र अमित शाह यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम आदी उपस्थित होते.
दरम्यान, पनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देण्यात आले. गटविकास अधिकारी समित वाठारकर, फॉरेस्ट अधिकारी एम.डी. राठोड यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
2014 साली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून वेगवेगळ्या योजना मोदी सरकारने गोरगरिबांसाठी सुरू केल्या. यामध्ये अशा काही योजना आहेत की, त्या पुढच्या पिढ्यांनाही त्याचा लाभ मिळेल. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, आयुष्मान भारत योजना, अटल पेन्शन योजना यांच्यासह अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा अनेक जण लाभ घेत आहेत. घरकुल योजनेतून तुम्हाला लाभ मिळतोय. तुमच्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी दिल्या.
Check Also
खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा …
RamPrahar – The Panvel Daily Paper