पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील भिंगारवाडी येेथे माजी सरपंच व पळस्पे विभागीय भाजप युवा मोर्चा अध्यक्ष योगेश लहाने यांनी जय हनुमान क्रिकेट संघाच्या माध्यमातून विद्युत प्रकाशझोतातील टेनिस बॉल रजनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत शिवकर येथील तिरंगा संघाने विजेतेपद पटकावून आमदार चषक जिंकला.
स्पर्धेचे उद्घाटन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले होते, तर उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी स्पर्धेस भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या होत्या.
चार दिवस रंगलेल्या या स्पर्धेत चुरशीचे सामने झाले. यात शिवकरच्या तिरंगा संघाने (एक लाख रुपये व भव्य चषक) बाजी मारली. द्वितीय क्रमांक डी. एस. स्पोर्ट्स तळेगाववाडी, तृतीय चेरोबा क्रिकेट संघ सांगडे व चतुर्थ क्रमांक परी इलेव्हन भाताण संघाने प्राप्त केला. त्यांना रोख रक्कम, चषक देण्यात आला.
स्पर्धेत मालिकावीर राहुल यादव (तळेगाववाडी), उत्कृष्ट फलंदाज प्रेम गायकवाड (शिवकर), उत्कृष्ट गोलंदाज प्रवीण भोईर (भाताण) व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सागर म्हात्रे ठरला. त्यांना टीव्ही, कुलर, शूज देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संदेश लहाने, नरेश लहाने, महेश लहाने, सुधीर लहाने, हेमंत ठाकूर, मोहन पाटील, कल्पेश लहाने, नरेश गायकर, प्रवीण शिसवे, राहुल पाटील, गजानन लहाने, अविनाश शिसवे, मिलन शिसवे, अमित लहाने यांनी सुयोग्य व्यवस्थापन केले होते.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …