कोविड रुग्णांच्या सेवेसाठी सरसावले आयुर्वेद तज्ज्ञ

पनवेल ः प्रतिनिधी

कोरोना पॉझिटिव्ह अल्प व मध्यम स्वरूपाच्या लक्षणांचा प्रादुर्भाव असणार्‍या रुग्णांना उपचार देण्यासाठी पनवेलमधील नामवंत आयुर्वेद तज्ज्ञ पुढे सरसावले असून, आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे औषध, आहार-विहार या त्रिसूत्रीचा वापर करून आयुर्वेदिक उपचाराने अनेक कोविड रुग्णांना फायदा होईल, असा विश्वास आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

शासनाने कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आयुष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. सदर टास्क फोर्समध्ये पनवेलमधील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अमित दवे सक्रिय सदस्य आहेत. या टास्क फोर्सच्या माध्यमातून कोविड प्रतिबंधात्मक उपाय, अलक्षणिक व अल्प लक्षणिक रुग्णांना वैकल्पिक आयुष उपचार देण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार आता पनवेलमधील 15 आयुर्वेदिक वैद्यांच्या टीमला इंडिया बुल्स व देवांशी इन येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना शासनाच्या अधिसूचनेत समाविष्ट औषधांचे रुग्णाच्या संमतीने उपचार करण्यास पनवेल महानगरपालिकेने परवानगी दिल्याने मागील आठवडाभर हे आयुर्वेद तज्ज्ञ स्वतः डॉनिंग आणि डॉफिंग करून प्रत्यक्षात रुग्ण तपासणी करीत आहेत. त्यांना 10 दिवसांची आयुर्वेदिक औषधे देऊन त्यांची रोज नोंद ठेवत आहेत. एका आठवड्यातच अल्प लक्षणे असणार्‍या रुग्णांत सकारात्मक बदल दिसत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ वैद्यांनी नोंदविले आहे. उपचारांसाठीची औषधे पनवेलमधील श्री धूतपापेश्वर लिमिटेड, पनवेल आणि दवे आयुर्वेद भवन यांच्यामार्फत उपलब्ध केली आहेत. डॉक्टर आपल्या पदरचे पैसे वापरून कोविड रुग्णांची विनामूल्य सेवा करीत आहेत. समाजातील सर्व स्तरातून याबाबत कौतुक होत आहे. चिकित्सा उपक्रमात डॉ. सुभाष जैन, डॉ. आशिष ठाकूर, डॉ. सुमुख नाईक, डॉ. समीक्षा नवरीकर, डॉ. अमृता नाईक, डॉ. अमित दवे, डॉ. गौरव दवे, पनवेल परिसरातील इतर प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ कोविड योद्धा म्हणून सहभागी झाले आहेत.

Check Also

Perish Arten bei Freispielen existieren in Moglich Casinos?

Neue Casinos via Freespins abzuglich Einzahlung Der ihr Hauptvorteile beim Zum besten geben in virtuellen …

Leave a Reply