Breaking News

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्त
वडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन वीर वूमन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना परेश ठाकूर यांनी डस्टबिन देताना केले.
सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या वीर वूमन्स फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडाळे तलाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी 12 डस्टबिन शनिवारी (दि. 8) देण्यात आले. क्लीन आणि ग्रीन पनवेल करण्याचे उद्देश समोर ठेवून फाऊंडेशनच्या अध्यक्ष अर्चना ठाकूर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी श्रुती निशार, सीमा जैन, पूनम जैन, नम्रता बंठिया, किर्ती मुनोत उपस्थित होत्या.

Check Also

खास महिला दिनानिमित्तमराठीतील पाच लक्षवेधक अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीच्या गौरवशाली इतिहासात अनेक गुणी अष्टपैलू, गुणी अभिनेत्रींचा सहभाग आहे. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक …

Leave a Reply