पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील नागरिकांसाठी आता आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक होणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉक्टर्स गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि धनवंतरी डायग्नोस्टिक्सच्या अत्याधुनिक पॅथोलॉजी लॅब सुरू झाली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मंगळवारी (दि. 15) या दोन्ही आरोग्य सुविधांचे उद्घाटन केले. आमदार प्रशांत ठाकूर कार्यक्रमास उपस्थित होते.
या वेळी बोलताना आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, केंद्र आणि राज्य सरकार चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करीत आहे आणि जवादे कुटुंबीयदेखील आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजाची सेवा करीत आहेत हे कौतुकास्पद आहे. त्यांनी पनवेल शहरात सुरू झालेल्या आधुनिक आरोग्य सुविधांबाबत समाधान व्यक्त केले तसेच पनवेल हे अवयव प्रत्यारोपणासाठी हब व्हावे, असे प्रतिपादन केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनीही जवादे कुटुंबियांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डॉक्टर्स गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमुळे परिसरातील रुग्णांना एकाच ठिकाणी विविध विशेषज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आधुनिक निदान सुविधा उपलब्ध होणार आहेत, असे ते म्हणाले.
डॉ. कैलास जवादे आणि डॉ. वैशाली जवादे यांच्या प्रयत्नातून एकाच ठिकाणी मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि अत्याधुनिक पॅथोलॉजी लॅब सुरू झाल्यामुळे पनवेल आणि आसपासच्या नागरिकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला माजी नगरसेवक राजू सोनी, माजी मुख्याध्यापक गोपीकिशन सिखवाल, प्रभाकर वाघीकर, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गोपाल जवादे, सुभाष देशमुख, मिलिंदा पोटे आदी उपस्थित होते.
Check Also
उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम
भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …
RamPrahar – The Panvel Daily Paper