मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली असून त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणी इडीकडून ही करावाई झाल्याचे सांगितले जात आहे. वरळी येथील प्लॉट खेरदी प्रकरणी मनी लॉण्ड्रिग झाल्याचा आरोप हा प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान ईडीने केलेल्या या कारवाईत पटेल यांच्या वरळी येथील घर जप्त करण्यात आले आहे. इक्बाल मिर्ची याने हा प्लॅट खरेदी केला होता आणि त्यानंतर हा एका डेव्हलपरने हा प्लॅट डेव्हलप केल्यानंतर यातले काही फ्लॅट पटेल यांना विकले. या व्यवहारात मनी लॉण्ड्रिंग करण्यात आल्याचा आरोप आहे.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper