Breaking News

पनवेल मतदारसंघात अंतर्गत भाजप मंडळ अध्यक्षांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व सध्या सुरू आहे. त्याला अनुसरून पक्षाच्या पनवेल तालुका ग्रामीण मंडळ अंतर्गत नेरे मंडळ अध्यक्षपदी भूपेंद्र पाटील आणि तळोजा मंडळ अध्यक्षपदी दिनेश खानावकर यांची नियुक्ती रविवारी (दि. 20) करण्यात आली. दरम्यान, पनवेल शहर अध्यक्षपदी युवा नेते सुमित झुंझारराव यांची नियुक्ती झाली आहे.
सुकापूर येथील बैठकीत भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत भूपेंद्र पाटील यांची नेरे मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ते भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांनी यापूर्वी पक्षाच्या विविध पदांवर यशस्वीपणे काम केले आहे. भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भूपेंद्र पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना पक्षवाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले.
या बैठकीस भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, पद्माकर पाटील, चिटणीस यतीन पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, सुनील पाटील, जनार्दन पाटील, सदाशेठ पाटील, पाली देवद अध्यक्ष किशोर सुरते, आकुर्लीचे सरपंच सचिन पाटील, विचुंबेचे सरपंच प्रमोद भिंगारकर, सुकापूरच्या सरपंच योगिता पाटील, ज्ञानेश्वर पाटील, महेश पाटील, रमेश पाटील, राजेश पाटील, उदय म्हस्कर, धनंजय पाटील, राजेश भोईर, विश्वजित पाटील, मुकेश फडके, राजेश काथारा, प्रवीण म्हात्रे, गुरूनाथ भोईर, दिनेश पाटील, दिव्येश भगत, हनुमंत खुटले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी नवनियुक्त नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नावडे कॉलनी येथे झालेल्या बैठकीत तळोजा मंडळ अध्यक्षपदी दिनेश खानावकर यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीस तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी नगरसेवक हरेश केणी, संतोष भोईर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, मन्सूर पटेल, सुरेशशेठ खानावकर, भूपेंद्र पाटील, नंदू म्हात्रे, नितेश पाटील, अरविंद गोंधळी, रवींद्र खानावकर, कृष्णाशेठ पाटील, नंदू भोपी, दीपक उलवेकर, अंकुश पाटील, नितीन पाटील, मदन खानवकर, सचिन पाटील, सचिन वास्कर, जयदास तेलवणे, शुभम खानावकर, राजेश पाटील, शंकर वगरे, आनंद सोनवणे, प्रताप चव्हाण, भूपेश खानावकर, लक्ष्मण खानावकर, राम खानावकर, राजेश खानावकर, अरविंद खानावकर, प्रीतम म्हात्रे, अजित म्हात्रे, रामबुवा कुडाळकर, शुभ पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी नवनियुक्त तळोजा मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
भाजप पनवेल शहर अध्यक्षपदी युवा नेते सुमित झुंझारराव यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील आणि भाजप पनवेल शहर मावळते अध्यक्ष अनिल भगत यांनी झुंझारराव यांचे अभिनंदन केले.
पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, चिटणीस अमरीश मोकल, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, प्रभाकर बहिरा, अजय बहिरा, माजी नगरसेविका रूचिता लोंढे, अमित ओझे, श्रीनंद पटवर्धन, उल्हास झुंझारराव, उमेश इनामदार, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, रोहित जगताप, अभिषेक भोपी, गौरव कांडपिळे, अभिषेक पटवर्धन, पवन सोनी, प्रतिक बहिरा, सपना पाटील, प्रीतम म्हात्रे, रूपेश नागवेकर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी नवनियुक्त पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply