उरण : रामप्रहर वृत्त
भाजप संघटन पर्व अंतर्गत उरण विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांची रविवारी (दि. 20) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.
उरण तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी धनेश गावंड, उरण शहर मंडळ अध्यक्षपदी प्रसाद भोईर, पनवेल तालुका ग्रामीण मंडळ अंतर्गत गव्हाण-वडघर अध्यक्षपदी रूपेश धुमाळ, पनवेल तालुका दक्षिण अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्वांचे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मावळते तालुका अध्यक्ष रवि भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, जीवन गावंड, सरचिटणीस सुनील पाटील, कैलास भोईर, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तरुण आणि उत्साही नेतृत्वामुळे उरण विधानसभा क्षेत्रात भाजप संघटना अधिक मजबूत होईल. हा युवावर्ग आपल्या कामातून पक्षाला नवी उंची गाठून देईल, असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केला.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper