Breaking News

महाराष्ट्राच्या मातीतील कुस्तीचा सर्वांना अभिमान -आमदार प्रशांत ठाकूर

रायगड कुस्ती प्रीमिअर लीगमध्ये कर्जत संघ अव्वल

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ आहे. त्यामुळे सर्वांना कुस्तीचा अभिमान आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते पनवेल तालुक्यातील नितळस येथे बोलत होते. पनवेल तालुक्यातील नितळस येथे जय हनुमान कुस्तीगिर संघाच्या वतीने रायगड कुस्ती प्रीमिअर लीग दोन दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जांभूळेश्वर मैदानात रंगलेल्या या स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 7) भेट देत आयोजकांचे कौतुक केले. या कुस्ती स्पर्धेत कर्जतच्या मावळे संघाने प्रथम, तर नेरे गावच्या शूरवीर संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. या संघांना अनुक्रमे एक लाख रुपये व चांदीची गदा आणि 50 हजार रुपये व चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, राम पाटील, वावंजे विभागीय अध्यक्ष प्रकाश खैरे, नितळसचे सरपंच डी. के. म्हात्रे, उपसरपंच विकास पाटील, कृष्णबुवा पवार, गोपीनाथ पाटील, संतोष गोंधळी, आयोजक पैलवान रूपेश पावशे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply