Breaking News

पनवेलमध्ये शेकापला, तर खालापुरात काँग्रेसला धक्का!

शेकाप नेते प्रभूदास भोईर, काँग्रेसचे कृष्णाशेठ पारंगे समर्थकांसह भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त
शेकाप वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभूदास भोईर ऊर्फ प्रभूअण्णा यांनी त्यांच्या जवळपास पंधराशे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करीत पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा दणका दिला, तर खालापूर तालुक्यातील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष कृष्णाशेठ पारंगे यांनीही त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रभूदास भोईर यांचे मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते भाजपची शाल देऊन पक्षात स्वागत करण्यात आले, तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कृष्णाशेठ पारंगे यांना प्रवेश देण्यात आला.
विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश आणि उत्तर रायगड जिल्ह्यातील नवनियुक्त मंडळ अध्यक्षांचा सत्कार समारंभ रविवारी (दि. 27) पनवेलमध्ये झाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, उपाध्यक्ष जयंत पगडे, सुधीर ठोंबरे, उरण तालुका माजी अध्यक्ष रवी भोईर, माजी नगरसेवक अनिल भगत, विजय चिपळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जीवन गावंड, अमित जाधव, ज्ञानेश्वर घरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभूअण्णा यांच्यासोबत वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष अतुल मारूती घरत, कार्याध्यक्ष विजय भोईर, माजी नगरसेविका प्रिया भोईर, प्रदेश खजिनदार भूषण म्हात्रे, कोन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य गुरूनाथ ठाकूर, समीर दळवी, ग्रामपंचायत सदस्य गोरख धुमाळ, विश्वनाथ शेळके, विशाल घरत, पनवेल तालुका वाहतूक अध्यक्ष प्रभाकर नाईक आणि शेकापच्या हजारो कार्यकर्त्यांनी तसेच कृष्णाशेठ पारंगे यांच्यासोबत चांभार्ली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिप पाटील, दापिवलीचे सुरेश गाताडे, देवळोलीचे माजी सरपंच रोहिदास पाटील, ग्रामपंचायत सदस्य सचिन चाळके, समीर दळवी, ललिता पडवळ, किशोर शिंदे, आनंद चव्हाण, प्रल्हाद शिंदे, मनसेचे बारवई अध्यक्ष सचिन पडवळ व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे पनवेलमध्ये शेकापला, तर खालापूर तालुक्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे.
उत्तर रायगड जिल्ह्यातील नवनियुक्त खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, नेरे मंडळ भूपेंद्र पाटील, कामोठे मंडळ विकास घरत, पनवेल शहर मंडळ सुमित झुंझारराव, कळंबोली मंडळ अमर पाटील, नवीन पनवेल मंडळ दशरथ म्हात्रे, तळोजा मंडळ दिनेश खानावकर, कर्नाळा मंडळ मंगेश वाकडीकर, उलवा मंडळ रूपेश धुमाळ, उरण शहर मंडळ प्रसाद भोईर, उरण ग्रामीण मंडळ धनेश गावंड, कर्जत शहर मंडळ राजेश लाड, कर्जत ग्रामीण मंडळ दिनेश रसाळ, खालापूर पश्चिम मंडळ प्रवीण मोरे, खालापूर पूर्व मंडळ सनी यादव, खोपोली मंडळ राहुल जाधव व नेरळ मंडळ अध्यक्ष नरेश मसणे यांचा या सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आगे आगे देखो होता है क्या! -लोकनेते रामशेठ ठाकूर
आपल्या परिसराचा विकास व्हावा यासाठी विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यशस्वी कामगिरी केली आहे तसेच पनवेल मतदारसंघातदेखील पक्षाला चांगले यश मिळाले असून येणार्‍या काळात आपले आणखी आमदार वाढणार आहेत. आपला विभाग मजबूत करा. पनवेल महापालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टिकोनातून कामाला लागा. भाजपमध्ये ज्या वेगाने पक्षप्रवेश होतोय, ज्यामुळे येणार्‍या काळात हा जिल्हा संपूर्ण भाजपमय होईल, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी करतानाच ’आगे आगे देखो होता है क्या’ असे सूचक वक्तव्य केले.

भाजप कार्यकर्त्यांना मान-सन्मान देणारा पक्ष -प्रभूदास भोईर
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेबांमुळे कार्यकर्त्यांची नेहमीच कॉलर टाईट असते. गेली 25 वर्ष माइयासारखा कार्यकर्ता त्यांची राजकीय कारकीर्द जवळून अनुभवतोय. मी व माझ्या हजारो समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि याचा सार्थ अभिमान वाटतोय, असे प्रतिपादन प्रभूदास भोईर यांनी केले. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने खर्‍या अर्थाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. गेली 25 वर्षे आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे काम करत होतो. कोणी लहान नाही किंवा मोठा नाही या भावनेने आम्ही एकदिलाने संघटनेचे काम केले, परंतु भाजप हा कार्यकर्त्यांना मान-सन्मान देणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे. यापुढे पक्षाच्या विचारधारेने व अधिक जोमाने काम करू, असेही प्रभूदास भोईर यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.

आम्ही पिढ्यान्पिढ्या शेकापमध्ये होतो, परंतु भाजपमध्ये काम करणार्‍याला संधी मिळते आणि या पक्षात काम करण्याची पद्धत चांगली आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या भाजपमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.
-अतुल मारुती घरत

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply