Breaking News

फुटपाथवरील झाडांचे संगोपण करा

खारघर भाजपची सिडकोकडे मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघरच्या फुटपाथवर लावण्यात आलेल्या झाडांचे नीट संगोपण केले जावे, अशी मागणी भाजपतर्फे सिडको प्रशासनाला करण्यात आली आहे. खारघर भाजपचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस गीता चौधरी व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी सिडकोचे खारघर शहराचे अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांना याबाबतचे निवेदन दिले. याबाबत मी त्वरित माहिती घेऊन कार्यवाही करीन, असे आश्वासन श्री. गिरी यांनी दिले. भाजपतर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनात खारघरच्या फुटपाथवर पीसीसी बांधकाम चांगलं झाले असून झाडंही लावण्यात आली आहेत. त्यांची वाढ व्हावी व मजबुती यावी यासाठी जो गोलाकार कट्टा बांधण्यात येतो त्याची रुंदी वाढवावी, तसेच झाडांच्या मुळाशी दगड टाकल्याने योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्याने व वाढीस जागा न मिळाल्याने झाडे पडून नुकसान, तर होईलच पण एक झाड कमी होऊन पर्यावरणाचा र्‍हास होईल, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply