Breaking News

स्व. दिलीप देसले यांची शोकसभा; मान्यवरांकडून आदरांजली

पनवेल : रामप्रहर वृत्त
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यात नवीन पनवेल येथील सुस्वभावी व्यक्तिमत्व दिलीप देसले यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अकस्मिक निधनामुळे शोककळा पसरली आहे. स्व. देसले त्यांच्या स्मरणार्थ रविवारी (दि. 27) नवीन पनवेल येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
शोकसभेला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित होते. सर्वांनी स्व. दिलीप देसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, दिलीप देसले यांचा समाजातील चांगल्या कार्याला नेहमीच पाठिंबा होता. त्यांच्यासारख्या व्यक्तीच्या जाण्याने समाजात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.
या शोकसभेस भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस चारुशीला घरत, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, जगदीश घरत, खारघर शहर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, नवीन पनवेल शहर मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, उलवे मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ, माजी नगरसेवक अनिल भगत, अ‍ॅड. मनोज भुजबळ, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर अभिषेक भोपी, रूपेश नागवेकर, रोहित जगताप, गौरव कांडपिळे, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, स्मिता वाणी, जितेंद्र वाघमारे, शिवाजी भगत, विजय म्हात्रे, राकेश भुजबळ, अक्षय सिंग, मयूर कदम, कोमल कोळी आणि स्व. दिलीप देसले यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply